Home » बुलडाण्याजवळ कारचा भीषण अपघात, दोन मित्र ठार

बुलडाण्याजवळ कारचा भीषण अपघात, दोन मित्र ठार

by Navswaraj
0 comment

बुलडाणा : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेईनासे झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील माजी नगरसेवक गोपाल देव्हडे यांचे लहान बंधु सुनिल आणि आणखी एकाचा महामार्गावर अपघातात मृत्यू झाला. चिखलीजवळ असलेल्या साकेगाव मार्गावरील वाघापूरजवळ हा अपघात घडला.

सुनिल देव्हडे (वय ३३) आणि हर्षद पांडे (वय ३०) ही अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. या अपघातात यश वाधवानी, आकाश चिंचोले, पप्पू राजपूत हे जखमी झालेत. यांची स्वीफ्ट डिझायर कार पळसाच्या झाडावर आदळल्याने हा अपघात झाला. वाघापूरजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातामुळे पळसाचे झाड मुळासह उन्मळुन पडले. घटनेनंतर ग्रामस्थांनी धावाधाव करून जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला होता.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!