Home » अकोल्यात प्रल्हाद महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

अकोल्यात प्रल्हाद महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

by Navswaraj
0 comment

अकोला : सदगुरू प्रल्हाद महाराज (रामदासी ) साखरखेर्डा यांचा ४३ वा पुण्यतिथि महोत्सव २७ – २८ ऑक्टोबर रोजी पांडुरंगजी भिरड मंगल कार्यालय डाबकी रोड येथे साजरा करण्यात येत आहे. दोन्ही दिवस सायं उपासना, अखंड नामस्मरण, भजन, किर्तन, शेजारती, काकडा आरती, महाभिषेक, भक्तीसंगीत, पंचपदी कार्यक्रम होईल. २८ ऑक्टोबर दुपारी १२. ३० ते २. ३० आरती, महाप्रसाद, रात्री ९. ३० ते १० सामुहिक नामस्मरण व गुलालाने कार्यक्रमाची सांगता होईल, असे श्री प्रल्हाद महाराज उपासना मंडळ अकोलाचे श्रीरामशास्त्री गदाधर भागवताचार्य यांनी कळवले आहे.

error: Content is protected !!