Home » अकोल्यात होणार दोन दिवसीय ग्रंथोत्सव

अकोल्यात होणार दोन दिवसीय ग्रंथोत्सव

by नवस्वराज
0 comment

अकोला : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राज्य ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवाजी कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 10 – 11 डिसेंबर 2022 दरम्यान ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

दोन दिवसीय ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसह, ग्रंथदिंडी, परिसंवाद, व्याखान, एकपात्री प्रयोग आदी भरगच्च कार्यक्रमांची साहित्य रसिक व ग्रंथप्रेमींना खास मेजवानी असणार आहे, अशीमाहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतुल वानखडे यांनी दिली आहे. ग्रंथोत्सवाचा प्रारंभ शनिवार दि. 10 रोजी सकाळी 12 वाजता ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीने होणार आहे.

उपमुख्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी एक वाजता ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती संगिता अढाऊ, खासदार ॲड. संजय धोत्रे, विधान परिषद सदस्य आ. डॉ. रणजीत पाटील, आ. अमोल मिटकरी, आ. ॲड. किरण सरनाईक, आ. वसंत खंडेलवाल, विधान सभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहतील.

error: Content is protected !!