Home » हरीहर शिवभक्त मंडळाचा रौप्य महोत्सव साजरा

हरीहर शिवभक्त मंडळाचा रौप्य महोत्सव साजरा

by Navswaraj
0 comment

अकोला : हरीहरपेठ येथील हरीहर शिवभक्त मंडळाचा रौप्य महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. श्रावण महिन्यानिमित्त संपूर्ण महिनाभर मंडळाच्यावतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या श्रृंखलेत प्रथम चतुर्थी तिथीला गणेश पूजन करण्यात आले.

श्रावण सोमवारी गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या जलाने भरलेल्या कावडीने अकोल्याचे आराध्य दैवेत श्री राजेश्वराला जलाभिषेक करण्यात आला. मंडळातील महिला सदस्यांनी दररोज आयोजित कीर्तनात उत्साहाने सहभाग घेतला. अंतिम श्रावण सोमवारी विशाल कावड काढण्यात आली. भाद्रपद शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला वेदमंत्रांसह श्री हरीहर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करीत रौप्य महोत्सवाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!