Home » केंद्रीय मंत्री गडकरी ट्रोल होतात तेव्हा…

केंद्रीय मंत्री गडकरी ट्रोल होतात तेव्हा…

by Navswaraj
0 comment

नागपूर : पुणे येथे वसंतदादा शुगर इन्सिट्युटच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी भाषणात नितीन गडकरी असे काही बोललेत की ते आता सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

कार्यक्रमात बोलताना नितिन गडकरी म्हणाले होते की आता पुणे ते बेंगलोर फक्त साडेतीन तासात प्रवास करता येणार असा महामार्ग काढणार आहे. मग काय, त्यांच्या या विधानाला नेटकऱ्यांनी चांगलेच घेरले आणि यावर थेट मिम्स बनविण्यास सुरवात केली.सध्या हे मिम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नितीन गडकरी यामुळे ट्रोल होत आहे. नेटकरी त्यांच्या यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

पुणे ते बेंगलोर मार्गाचे अंतर ८४१.२ किलोमीटर आहे. हे अंतर पूर्ण करण्यासाठी सलग प्रवास केल्यास १३ तास ४१ मिनिट लागतात. पण गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे १३ तासांचे अंतर साडेतीन तासात कसे पूर्ण करणे शक्य होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यातच इंटरनेट आणि सोशल मीडियावरील टवाळखोरांनी या वाक्याचे भांडवल करत गडकरींवर मिम्स तयार केले आहेत. गडकरींना टॅग करीत हे मिम्स पोस्ट करण्यात येत आहेत. पण अशा टीकेमुळे अस्वस्थ होतील ते गडकरी कसले. कोरोनाच्या लोकडाऊन काळात रस्ते निर्मितीचे अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या गडकरींनी आपल्या मंत्रालयाला पुणे ते बंगलोर नव्या मार्गाच्या कामाला लागा असे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रात बांधकाम मंत्री असताना गडकरींनी काँक्रिट रस्ते आणि अनेक उड्डाणपुलांची उभारणी केली. त्यामुळेच त्यांना रोडकरी असेही संबोधले जाऊ लागले. केंद्र सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतरही त्यांनी अशक्य वाटणारी रस्त्याची व पुलांची कामे पूर्ण करून दाखवित अनेक विक्रम केले. भारतातील पाहिला डबलडेकर मेट्रो रेल्वे पूलही नागपुरात उभारून दाखविला. त्यामुळे रोडकरी असलेल्या गडकरींसाठी रस्ते निर्मितीबाबत काहीही अशक्य नाही असे त्यांचे विरोधकही कबूल करतात. अशात सोशल मिडियावरील टवाळखोर काहीही खुरापती करती असले तरी पुणे ते बंगलोर महामार्गाबाबत गडकरी नक्की काहीतरी विक्रमी करतील, असे अनेकांना वाटत आहे.

error: Content is protected !!