Home » मेळघाटात आदिवासी महिलांनी अजित पवारांना रोखले

मेळघाटात आदिवासी महिलांनी अजित पवारांना रोखले

by नवस्वराज
0 comment

अमरावती : मेळघाटातील संतप्त आदिवासी महिलांनी विधान सभेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे बाहुबली नेता अजित पवार यांचा ताफा रोखला. कळमखार गावाजवळ शनिवार, २० ऑगस्ट २०२२ रोजी ही घटना घडली. रस्ता व सांडपाणी वाहुन जाण्यासाठी नाल्या नसल्याने पावसाने पाणी परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये शिरते. या त्रासामुळे कंटाळत आदिवासी महिलांनी पवारांचा ताफा रोखला.

पवार यांनी संयमाने परिस्थिती हाताळत आंदोलन करणाऱ्या महिलांशी संवाद साधला. कळमखारसह परिसरातील अनेक गावांमध्ये रस्ते व नाल्या नाहीत. बहुतांश रस्ते उखडले आहेत. रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात परिस्थिती आणखी बिकट होत, याकडे आदिवासी महिलांनी लक्ष वेधले. पवार दौऱ्यावर येणार असल्याने काही भागातील खड्डे बुजविण्याचा व सर्व काही सुस्थितीत असल्याचा देखावा करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. आदिवासी महिलांचा संताप बघता अजित पवार यांनी मेळघाटातील समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेऊ, असे आश्वासन त्यांना दिले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या अमरावती ग्रामीण पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!