Home » स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : नागपुरात तृतीयपंथियांनी गायले समूह राष्ट्रगीत

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : नागपुरात तृतीयपंथियांनी गायले समूह राष्ट्रगीत

by नवस्वराज
0 comment

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानानंतर बुधवार, १७ ऑगस्ट २०२२ रोजी सर्वत्र सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आर. विमला यांच्या उपस्थितीत समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले.

सकाळी ११ वाजता सर्वांच्या गर्दीत लक्ष वेधले ते नागपूरच्या तृतीयपंथीयांनी. नागपुरातील तृतीयपंथियांनी एकत्र येत सामूहिक राष्ट्रगीत गायन केले. नागपुरातील व्हरायटी चौकात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत हा उपक्रम राबविण्यात आला. नागपुरातील वर्दळीच्या रस्त्यांवरदेखील नागरिकांनी उस्फूर्तपणे राष्ट्रगीत गायन करीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. आपापल्या घरांवर तिरंग फडकवताना व राष्ट्रगीत गायन करताना आम्हाला गौरवास्पद वाटत होते, असे तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या विद्या कांबळे यांनी सांगितले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!