Home » अकोल्यात वाहतूक पोलिसाने परत केली पैशांनी भरलेले पाकीट

अकोल्यात वाहतूक पोलिसाने परत केली पैशांनी भरलेले पाकीट

by Navswaraj
0 comment

अकोला : पैश्याने भरलेले पाकीट संबंधित व्यक्तीला अकोला पोलिस दलात कार्यरत वाहतूक पोलिसाने परत केले. सुपेश इंगळे हे प्रामाणिकपणा दाखविणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून ते नेहरूपार्क येथील चौकात कर्तव्यावर होते.

नेहरूपार्क चौक येथे कर्तव्यावर असताना सुपेश यांना रस्त्यावर एक पॉकेट पडलेले दिसले. त्यांनी ते पाकीट शहर वाहतूक शाखेत जमा केले. पाकिटात एटीएम कार्ड, महत्वाची कागदपत्रे व सात हजार रुपये होते. पाकिटातील कागदपत्रांवरून सुपेश यांनी मालकाचा शोध घेतला. अकोट फैल भागातील सुमित विश्वनाथ खवळे यांचे हे पाकीट होते. सुपेश यांनी त्यांना हे पाकीट परत केले. सुमित यांनी यासाठी सुपेश आणि अकोला वाहतूक पोलिसांचे आभार मानले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!