Home » भारत जोडो यात्रेमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल

भारत जोडो यात्रेमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल

by नवस्वराज
0 comment

अकोला : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातून जाणार आहे. या यात्रेदरम्यान जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत .

१६ नोव्हेंबरला अकोला, पातूर मेडशीमार्गे वाशीम जिल्ह्यातील मालेगाव पर्यंत जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग बंद असेल. १७ नोव्हेंबर रोजी मालेगाव पातूर, वाडेगावमार्गे बाळापूरकडे येणारी वाहतूक बंद असेल. १८ नोव्हेंबरला पारस फाटा, शेगांव नाका मार्गावरील वाहतूक बंद असेल .

१६ नोव्हेंबर वाहन चालकांना मालेगाव, शेलुबाजार, महान, बार्शिटाकळीपर्यंत अकोलामार्गे यावे लागेल. १७ नोव्हेंबरला मालेगाव, मेडशी, पातूर, चिखलगाव, कापशीमार्गे अकोला यावे लागेल. १८ नोव्हेंबरला प्रवास करण्यासाठी नागरिकांना शेगांव टी- पॉइंट गायगाव, उरळ, निंबा फाटा शेगांवमार्गे खामगांवकडे जावे लागेल.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!