Home » अकोट-अकोला शटल रेल्वसेवेच्या वेळा घोषित

अकोट-अकोला शटल रेल्वसेवेच्या वेळा घोषित

by Navswaraj
0 comment

अकोला : अकोट आणि अकोला या दोन शहरांना जोडणाऱ्या शटल रेल्वे सेवेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय रेल्वे बोर्डाचे उपनिदेशक (कोचिंग) विवेक कुमार सिन्हा यांनी याबाबतचे आदेश जरी केली आहेत.

सद्य:स्थितीत अकोला येथुन अकोटसाठी शटल सेवेच्या दोन फेऱ्या सोडण्यात येणार आहे. अकोट येथुन अकोल्यासाठीही दोन फेऱ्या सोडण्यात येणार आहे. आपल्यावरून अकोट साठीची पहिली गाडी सकाळी सहा वाजता निघेल. दुसरी गाडी अकोल्यावरून सायंकाळी सहा वाजता निघेल. अकोट येथून अकोल्यासाठी पहिली गाडी सकाळी आठ वाजता सोडण्यात येईल. दुसऱ्या गाडीची वेळ रात्री आठ वाजता असेल. उगवा, गांधीग्राम आणि पाटसूळ येथे शटल रेल्वेला थांबा देण्यात आला आहे. अकोट अकोला रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण अद्याप झालेले नाही. त्यामुळे सुरुवातीला मर्यादित स्वरूपात शटल रेल्वे सेवेच्या फेऱ्या सोडण्यात येतील असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या मार्गावरील प्रवाशांची संख्या बघता शटल रेल्वेच्या फेऱ्या वाढवायच्या काय, याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!