Home » लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे पुन्हा होणार अनावरण

लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे पुन्हा होणार अनावरण

by Navswaraj
0 comment

अकोला : महानगरपालिके जवळील त्रिकोणी कोपऱ्यावर पूर्वी एक छोटेखानी बगिचा होता. तेथेच पाणपोई देखील होती. नवीन बसस्थानकाभिमूख लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे. काही वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यामुळे पुतळ्याची आणि परिसराची दुरावस्था झाली होती. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी निधी उपलब्ध करून देऊन स्मारकाचे नूतनीकरण केले.

स्मारकाचा लोकार्पण सोहळा शनिवार, २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता आमदार गोवर्धन शर्मा यांचे हस्ते अकोला महानगरातील मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. नूतनीकरण झालेल्या लोकमान्य टिळक स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी एखाद्या स्वयंसेवी संस्थेने स्वीकारावी, नाहीतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती होईल, अशी भावना नागरीक व्यक्त करित आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!