Home » Tiger 3 : टायगर थ्री दुसऱ्या दिवशी बाॅक्स ऑफिसवर माघारला

Tiger 3 : टायगर थ्री दुसऱ्या दिवशी बाॅक्स ऑफिसवर माघारला

by Navswaraj
0 comment

मुंबई Mumbai : यशराज फिल्सचा टायगर थ्री १२ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगला गल्ला जमवला मात्र दिवाळीच्या सलग सुट्ट्या असूनही दुसऱ्या दिवशी कमी ॲडव्हान्स बुकिंगमुळे बाॅक्स ऑफिसवर माघारला. (Tiger 3 Bollywod Movie Collection Drops Down Due to less Advance Booking)

चित्रपटाच्या ६३ हजार ५४३० तिकीटांची विक्री ॲडव्हान्स बुकिंगद्वारा झाली. ज्यामुळे १७.४८ कोटींची कमाई केली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंग द्वारा झालेल्या ७४ हजार ८८०६ तिकिटांच्या विक्रीच्या माध्यमातून २१.६२ कोटी रूपये कमाई केली. त्या तुलनेत टायगर थ्रीचे उत्पन्न कमी आहे. प्रथम दिवशी चित्रपटाने एकूण ४२ कोटींची कमाई केल्याचा अंदाज आहे. चित्रपट मोठ्या बॅनरचा असल्यामुळे मोठी कमाई देखील अपेक्षित आहे. परंतु प्रेक्षकांचा दुसऱ्या दिवशीचा एकूण कल बघता आता स्पाॅट बुकिंगवर चित्रपटाचे आर्थिक भवितव्य अवलंबून असल्याचे चित्रपट समीक्षकांचे मत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!