Home » बंगालमध्ये तीन महिलांना एक किलोमीटर दंडवताची शिक्षा?

बंगालमध्ये तीन महिलांना एक किलोमीटर दंडवताची शिक्षा?

by Navswaraj
0 comment

कोलकाता : तीन महिलांनी एक किलोमीटर लांब रस्त्यावर दंडवत घालत पश्चिम बंगालच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची अजब घटना घडली आहे. दंडवत घालणाऱ्या तीनही महिला आदिवासी समाजाच्या आहेत. या तीन महिलांनी यापूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्याचे प्रायाश्चित्त म्हणून या महिलांना दंडवत घालण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

ही घटना बालूरघाटच्या तपनची आहे. गावातील तीन महिलांनी आधी भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र त्या तृणमूल काँग्रेसमध्ये परतल्या. त्यानंतर भर रस्त्यावर त्या दंडवत घालताना दिसल्या. या महिलांनीच भाजपात जाण्याच्या आपल्या कृत्याचे स्वत:हुन प्रायाश्चित केल्याचा प्रतिदावा तृणमूल काँग्रेसने केला असून भाजपाच्या आरोपांचे खंडन केले आहे. दरम्यान हे प्रकरण आता महिला आयोगाकडे पोहोचले आहे. याप्रकरणी भाजपाचे तक्रार करण्याची तयारी चालवलीय.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!