Home » अकोला जिल्ह्यातील तीन खेळाडूंना तायक्वांडो स्पर्धेत सुवर्णपदक

अकोला जिल्ह्यातील तीन खेळाडूंना तायक्वांडो स्पर्धेत सुवर्णपदक

by Navswaraj
0 comment

अकोला : संयुक्त भारतीय खेळ फाउंडेशनच्यावतीने नेपाळ येथे १६ ते १९ नोव्हेंबर २०२२ दरम्यान आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अकोल्यातील खेळाडूंनी तीन सुवर्णपदके पटकाविली.

जगभरातील 9 देशांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील 75 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यात अकोला जिल्ह्यातील १४ वर्षाआतील वयोगटात गणेश परमेश्वर वानखडे यांने 30 किलो वजन गटात नेपाळच्या खेळाडुला पराभूत केले. 17 वर्षाआतील वयोगटात सुजल सचिन काळबेंडे यांने 45 किलो वजन गटात श्रीलंकेच्या खेळाडूला पराभूत केले. आविष्कार सुनिल भोजने याने 17 वर्षाआतील वयोगटात 40 किलो वजनगटात तुर्कीच्या खेळाडूला पराभूत करुन सुवर्ण पदक पटकाविले. खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक अनंत पाचकवडे यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंचा पंकज गवले, विलास अनासाने व प्रमोद बुटे यांनी सत्कार केला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!