Home » Chandrapur Crime : कौटुंबिक कलहातून केली परिवारातील तीन सदस्यांची हत्या

Chandrapur Crime : कौटुंबिक कलहातून केली परिवारातील तीन सदस्यांची हत्या

Police Action : पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेतले

by नवस्वराज
0 comment

Chandrapur : कौटुंबिक वादातून धडणाऱ्या हत्यांच्या घटनांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मौशी या गावात कौटुंबिक वादातून तिहेरी हत्याकांडाचे प्रकरण समोर आले आहे. एका परिवारातील पतीने कुटुंबातील तिघांची हत्या केल्याची थरकाप उडवणारी घटना गावात घडली आहे.

अंबादास तलमले (वय 50) हे त्यांची पत्नी अल्का (वय 40), मुली प्रणाली (वय 20), तेजू (वय 20) व मुलासह मौशी या गावात राहत होते. अंबादास यांचे पत्नी अल्का यांच्यासोबत नेहमी वादविवाद व भांडण होत होते. रविवार 3 मार्च रोजी सकाळी त्यांचा मुलगा घराबाहेर गेला असता, त्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य झोपलेले होते. या संधीचा फायदा घेत अंबादास याने झोपेत असलेल्या पत्नी अल्का मुली प्रणाली व तेजू या तिघांवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. सकाळी हत्येची माहीती गावात पसरताच नागभिड पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळ गाठत तीनही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. संशयीत आरोपी अंबादास तलमले याला पोलीसांनी अटक केली आहे. हत्येचे कारण अजून समोर आलेले नसून, नागभीड पोलीस हत्येच्या घटनेचा तपास नागभीड पोलिस करीत आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!