Home » शेगावजवळ क्रुझरचा अपघात, तिघांचा मृत्यू

शेगावजवळ क्रुझरचा अपघात, तिघांचा मृत्यू

by नवस्वराज
0 comment

शेगाव (जि. बुलडाणा) : पंढरपूर येथुन परत येत असलेल्या भाविकांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर सात भाविक जखमी झालेत. हा भीषण अपघात सोमवार, २२ मे २०२३ रोजी सकाळी सहाच्या सुमारास घडला.

पंढरपूर येथुन विठ्ठल रुख्मिणीच्या मंदिरात दर्शनासाठी शेगावातील काही भाविक गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर हे सर्व भाविक क्रुझर वाहनाने शेगाव येथे परत येत होते. परतीच्या प्रवासादरम्यान शेगावपासून काही अंतरावर या भाविकांचे वाहन शेगाव मार्गावर लावण्यात आलेल्या स्वागत कमानीच्या पिलरवर धडकली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आसपासच्या ग्रामस्थांनी व पोलिसांनी अपघातस्थळ गाठत जखमींना शेगावच्या सईबाई मोटे रुग्णालयात हलविले, मात्र तोपर्यंत तीन भाविकांचा मृत्यू झाला होता.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या भाविकांवर सईबाई मोटे रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार या भाविकांचे घर अपघातस्थळापासून अगदी दोन किलोमीटर आहे. पंढरपूरवरून निघाल्यापासून भाविकांचा रात्रभर प्रवास सुरू होता. वाहन शेगावजवळ आले असताना कदाचित चालकाचा ताबा सुटला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!