Home » विलास गायकवाड प्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक

विलास गायकवाड प्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक

by Navswaraj
0 comment

अकोला : अकोल्यातील दोन समुदायात झालेल्या जातीय दंगलीत मृत्यूमुखी पडलेल्या विलास गायकवाड प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे याप्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता तीन झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांनी या वृत्तास दुजोरा दिला.

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यामुळे १२ मे २०२३ रोजी शहरात जातीय हिंसाचार झाला होता. या घटनेत विलास गायकवाड नावाच्या व्यक्तीचा खून झाला होता. या हत्येतील आणखी एका आरोपीला स्थानिक शाखा पोलिसांनी अटक केली आहे. विलास गायकवाड खून प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शेख जावेद उर्फ ​​काला गुड्डू शेख मुनावर राहणार खिडकीपुरा याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी यापूर्वी पोलिसांनी शेख सद्दाम आणि शेख शफीक यांना अटक केली होती. आता या घटनेतील आरोपींची संख्या तीन झाली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, असे स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी स्पष्ट केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!