अकोला : पुणे येथील सिंबायोसिस महाविद्यालया मधील अशोक सोपान ढोले या प्राध्यापकाने लेक्चर दरम्यान हिंदू देवतांबद्दल अपमानास्पद शब्द वापरले. हिंदू तसेच विद्यार्थ्यी संघटनांनी दाखल केलेल्या तक्रारीचे अनुषंगाने पोलीसांनी ढोले वर भारतीय दंड विधानचे कलम २९५ अ अन्वये गुन्हा दाखल केला. ढोले हिंदी विषय शिकवत होता, घडल्या प्रकारानंतर महाविद्यालय प्रशासनाने त्याची हकालपट्टी केली.
भारतीय सिनेमा हिंदू देवीदेवतांची खिल्ली उडवण्यात अग्रेसर आहे. मनोरंजनाच्या बुरख्याआड हिंदू देवतांचा अपमान करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. टिव्ही वरील मालिका, कार्यक्रम आणि जाहिरात देखील यात मागे नाही. सिनेसृष्टी, टिव्ही वाहिन्या, कार्यक्रमाचे प्रायोजक, जाहिरातदारांनी धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरून हिंदू समाज हा अंद्धश्रद्ध, प्रतिगामी, कट्टर, अमानवी, संकुचित वृत्तीचा अहिष्णू असल्याचे लोक मनावर बिंबवण्याची सुपारी घेतली आहे.
लोकशाहीत विविध माध्यमाद्वारा विचार प्रदर्शित करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. परंतु यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही, या कर्तव्याची जाण ठेवणे आवश्यक आहे.
शासनाने धार्मिक भावना दुखाणार्यांचे बाबतीत कायदा करावा, दोषी आढळल्यास कडक शिक्षा देण्याचे प्रावधान त्यात असावे. सामाजिक वातावरण गढूळ करणार्यांवर नुसता गुन्हा दाखल करून चालणार नाही.