Home » बुल्गेरिया देशात भरतो नवरानवरींचा बाजार

बुल्गेरिया देशात भरतो नवरानवरींचा बाजार

by Navswaraj
0 comment

मुंबई : आपण भाजी तसेच जनावरांचा बाजार भरत असल्याचे बघतो. परंतु बुल्गेरिया देशाच्या स्तारा जागोरा नावाच्या ठिकाणावर वर्षातून तब्बल चार वेळा नवरानवरींचा बाजार भरतो, हे ऐकून नवल वाटेल पण हे सत्य आहे. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या समुदायाचे लोक रहातात त्यांच्या संस्कृती आणि प्रधा देखील वेगवेगळ्या आहेत.

याबाजारात मुलींवर बोली लावली जाते. मुलींचे आईवडीलच त्यांना या बाजारात आणतात. नवरींची खरेदी करणारे अनेक लग्नाळू येथे येतात आणि आपल्या आवडीच्या मुलीवर बोली लावतात. जे सर्वात जास्त बोली लावतील मुलीचे आईवडील आपल्या मुलीचे लग्न त्याच्या सोबत ठरवतात. एका अहवालानुसार यामुलींचे वय १३ ते २० वर्ष असते.

नवरींचा हा बाजार तेथील कलाइदझी समाजाकडुन भरवण्यात येतो. या बाजारात बाहेरील व्यक्ती नवरी खरेदी करू शकत नाही. यासमाजाचे सद्या २० हजार लोक आहेत. समाजातील लोक आपल्या मुलींना १३ – १४ वयानंतर शाळेतून काढतात. मुलींना देखील या परंपरे बद्दल विशेष असा आक्षेप नाही कारण त्यांना यासाठी मानसिक दृष्टिकोनातून तयार करण्यात येते. अहवालानुसार याबाजारात मुलींवर ३०० ते ४०० डाॅलर इतकी बोली लागते. याबाजारात जाण्यासाठी मुली देखील अनेक दिवसांपासून तयारी सुरू करतात, कारण जास्त पैसे मिळवण्यासाठी सुंदर दिसणेही तितकेच महत्त्वाचे असते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!