Home » क्रांतीदिन विशेष : भारत छोडोचा पहिला नारा दिला गेला सेवाग्राममधुन

क्रांतीदिन विशेष : भारत छोडोचा पहिला नारा दिला गेला सेवाग्राममधुन

by नवस्वराज
0 comment

वर्धा : ब्रिटिशांविरुद्ध आजपासून 80 वर्षांपूर्वी देण्यात आलेला ‘भारत छोडो’चा नारा सर्वप्रथम विदर्भातील सेवाग्राम येथील बैठकीत देण्यात आला होता. इंग्रज सरकारविरुद्ध या लढ्याला आता 80 वर्ष तर भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत.

ऑगस्ट क्रांतीची महत्वाची बैठक सेवाग्राम आश्रमात झाली होती. महात्मा गांधी हे 1933-34 मध्ये वर्धा येथे आलेत. त्याकाळी वर्ध्याचे नाव पालकवाडी होते. 1935 मध्ये मगनवाडी आजचे एमगिरी केंद्र येथे एका खोलीत होते. मिराबेन यांनी शोधलेली शांत जागा म्हणजेच तत्कालीन शेगाव व आजचे सेवाग्राम. येथे आश्रम स्थापन करण्यात आला. साबरमती आश्रमातून दांडी यात्रेला निघाल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत साबरमतीला परतणार नाही असा निर्णय महात्मा गांधींनी घेतला होता. दांडीयात्रे दरम्यान इंग्रजांनी गांधीजींना दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. गांधीजी जेव्हा बाहेर आले तेव्हा देशाच्या मध्यभागी असलेल्या एखाद्या गावाला स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीचे केंद्र बनवावे असे ठरले. यात महात्मा गांधीजींचे मानसपुत्र असलेल्या जमनालाल बजाज यांनी वर्ध्यात येण्याचा आग्रह केला. त्यानुसार महात्मा गांधी वर्धा येथे आलेत.

‘भारत छोडो’ हा नारा 8 ऑगस्ट 1942 मध्ये मुंबईत दिला गेला, पण या संदर्भात महत्वाची बैठक सेवाग्राम आश्रमात झाल्या. बैठकीला जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, खान अब्दुल गफ्फार खान आदी अनेक नेते उपस्थित होते. यात महत्वाची बैठक 9 जुलै 1942 ला सेवाग्राम आश्रमात पार पडली. ‘भारत छोडो’ हा शब्द ‘चले जाव’वरून घेण्यात आला. मुंबई बंदरावर युसूफ मेहर अली, त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सायमन कमिशनला गो बॅक’चे फलक दाखवले होते. आंदोलनाला काय नाव द्यावे यावर चर्चा झाली. बापूंना सर्वांना समजेल सोपा शब्द अपेक्षित होता. युसूफ अली यांनी वापरलेला ‘गो बॅक, क्विट इंडिया’ हा शब्द सुचविला. बापूंनी तो मान्य करून पुढे ‘भारत छोडो’ क्विट इंडिया’ हा शब्द पुढे आला. आंदोलनांला भारत छोडो आंदोलन असे नाव मिळाले. तेच आंदोलन ऑगस्ट क्रांती म्हणून ओळखले जाते.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!