Home » अकोल्यात ‘ऑक्टोबर हीट’चे चटके वाढले

अकोल्यात ‘ऑक्टोबर हीट’चे चटके वाढले

by Navswaraj
0 comment

अकोला : ‘ऑक्टोबर हीट’च्या चटक्यांमध्ये वाढ झाली असून बुधवारी अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. राज्यातील कमाल तापमान आतापर्यंत ३० अंशाच्या खाली गेले होते. ते आता ३५ अंशांच्या पुढे गेले आहे. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

तापमानात झपाट्याने वाढ होत असून असह्य उकाडा आणि उन्हाच्या चटक्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, किमान तापमानात राज्यात गेल्या आठ दिवसांपासून किंचित घट झाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत वातावरणात मोठा बदल झाला आहे. दिवसा कडक ऊन, तर रात्री आणि पहाटे थंडी जाणवत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!