Home » वकिलाने राजीनामाच दिला कारण कँटिनमधील समोसा महागला

वकिलाने राजीनामाच दिला कारण कँटिनमधील समोसा महागला

by admin
0 comment

नागपूर: जिल्हा न्यायालयातील कँटिनमधील समोसा अधिकच महागल्यावरून वकील संघटनेच्या एका सदस्याने नाराज होत थेट राजीनामाच दिला आहे. हे कँटिन वकील संघटनेतर्फे चालविले जाते. अॅड. धर्मराज पी. बोगाटी, हे राजीनामा देणाऱ्या वकिलाचे नाव आहे.

यालयाच्या दुसऱ्या माळ्यावर डीबीएद्वारे कँटिन चालविली जाते. गेल्या काही दिवसांपासून खाद्य पदार्थांचे दर दुपटीने वाढविण्यात आले आहेत. डीबीएच्या कँटिनने वकिलांना वाजवी किमतीत खाद्यपदार्थ पुरविणे अपेक्षित आहे, मात्र तसे होत नव्हते. त्यामुळे डीबीचे कार्यकारिणी सदस्य अॅड. धर्मराज बोगाटी यांनी डीबीएचे काही पदाधिकारी वकिलांचे हित बघण्यापेक्षा त्यांच्याकडून अधिक पैसे वसूल करीत असल्याचा आरोप करीत राजीनामा दिला. कँटिनमध्ये डीबीएद्वारे साधा समोसा ३० रुपये प्लेट या दराने विकला जातो. तर दही किंवा सांभारसोबत एक प्लेट समोस्याचा दर ४० रुपये इतके आहेत. हायकोर्ट बार असोसिएशनतर्फेसुद्धा कँटिन चालविली जाते. तिथे साध्या समोस्याचा दर २५ रुपये प्रती प्लेट तर दही किंवा सांभारसोबतच्या समोस्याचा दर ३५ रुपये प्रती प्लेट आहेत.

‘समोस्याच्या दरावरून जर कुणी राजीनामा देत असेल तर जिल्हा न्यायालयात तक्रार करण्याजोगे मुद्देच उरलेले नाहीत, असे समजतो. त्यामुळे आमच्या कार्यकारिणीने चांगले काम केले आहे, याची ही पावती आहे. सिलिंडर व पेट्रोलचे वाढते दर लक्षात घेता सगळ्याच क्षेत्रात व विशेषत: खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात महागाई वाढली आहे, हे सत्यच आहे. शहरात अनेक ठिकाणी समोस्याचे दर हे ३५ ते ४० रुपये प्लेट असेच आहेत. यात आम्ही काहीच लूट करत नाही. हे काही राजीनामा देण्याचे कारण ठरू शकत नाही’, असे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. कमल सतुजा यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!