Home » ठाकरे गटाचे वेळकाढू धोरण कोर्टाच्या लक्षात आलेय : फडणवीस

ठाकरे गटाचे वेळकाढू धोरण कोर्टाच्या लक्षात आलेय : फडणवीस

by Navswaraj
0 comment

नागपूर : उद्धवजींची शिवसेना वेळ काढून नेण्यासाठी अनेक क्लुप्त्या न्यायालयात वापरत आहे. त्यामुळेच त्यांनी सत्तासंघर्षाचे प्रकरण सात न्यायाधीषांच्या खंडपीठाकडे पाठवण्याची मागणी केली आहे. वेळकाढू धोरण त्यांचे होते की ज्यामुळे वर्षभर निकालच लागू नये. पण आता असे होणार नाही. खटल्याची नियमित सुनावणी सुरू झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल आता लवकरच लागेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते. न्यायालयाने सांगितले की नबम राबियाचा जो निकाल आहे, त्या निर्णयावर पुनर्विचार व्हावा म्हणून सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण पाठवा, ही मागणी संयुक्तिक नाही. त्यामुळे मेरीटवर आम्ही संपूर्ण प्रकरण ऐकू आणि अंतिम निर्णय द्यायचा की सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवायचे हे ठरवू, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मला जेलमध्ये टाकून जिवे मारण्याचा प्लॅन होता, असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले. याबाबत विचारले असता, ते काहीही आरोप करू शकतात. संजय राऊत दिवसातून तीन वेळा वेगवेगळे आरोप करतात. सकाळी काय आरोप केला, हे संध्याकाळी त्यांच्याच लक्षात राहात नाही. त्यामुळे या त्यांच्या आरोपावर मी काय उत्तर देणार आहे, असा प्रतिप्रश्‍न फडणवीस यांनी केला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!