Home » रेझिस्टन्स फ्रंटने केली आरएसएसच्या ३० नेत्यांची टार्गेट लिस्ट

रेझिस्टन्स फ्रंटने केली आरएसएसच्या ३० नेत्यांची टार्गेट लिस्ट

by Navswaraj
0 comment

नागपूर : दहशतवादी संघटना ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काश्मिरातील ३० महत्वाच्या लोकांच्या नावाची ‘हिट लिस्ट’ जाहीर केली आहे. कोणत्याही परिस्थितीत रक्तपात घडवू अशी धमकी या संघटनेने दिली आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी १ एप्रिल रोजी केलेल्या वक्तव्यानंतर दहशतवादी गटाची ही धमकी आली आहे. भागवत म्हणाले होते- स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही पाकिस्तान खुश नाही. फाळणी ही चूक होती हे त्यांना आता पटले आहे. संयुक्त भारत हे वास्तव होते आणि विभाजित भारत हे दुःस्वप्न होते. जम्मू-काश्मीरमधील सक्रिय रेझिस्टन्स फ्रंट ही लश्कर-ए-तैयबाची शाखा आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या विरोधात ही फ्रंट ऑनलाइन मोहीमही चालवते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या फ्रंटने कराचीतील या ऑनलाइन मोहिमेच्या सहा महिन्यांनंतरच आपली संघटना तयार केली. ही तेहरिक-ए-मिल्लत इस्लामिया आणि गझनवी हिंद या इतर संघटनांसारखीच आहे.

संघटनेने २०२० नंतर जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यांची जबाबदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्याच्याशी संबंधित लोकांना सोपोरमधून अटक केल्यावर ही फ्रंट उघडकीस आली. एकेकाळी येथे लश्कर, जैश आणि हिजबुलचा मोठा प्रभाव होता. अटक केलेल्या दहशतवाद्यांनी सांगितले होते की, ते नवीन संघटनेसाठी भरती करत आहेत. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले होते की, २०२२ मध्ये मारले गेलेले बहुतेक दहशतवादी हे रेझिस्टन्स फ्रंट किंवा लष्करचे होते. त्यांची संख्या १०८ होती. मारल्या गेलेल्या जैशच्या दहशतवाद्यांची संख्या ३५ होती.

error: Content is protected !!