Home » फलकाच्या विटंबनेनंतर खामगाव परिसरात तणाव

फलकाच्या विटंबनेनंतर खामगाव परिसरात तणाव

by Navswaraj
0 comment

खामगाव (जि. बुलडाणा) : खामगाव येथे घाटपुरी भागात भीम जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या पोस्टरवर अज्ञात व्यक्तीने चिखलफेक केली. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला.

घटनेचा निषेध म्हणून संतप्त अनुयायी रस्त्यावर उतरले असून घाटपुरीसह खामगाव परिसरात तणाव निर्माण झाला होता. माहिती वाऱ्यासारखी पसरताच आंबेडकरी चळवळीतील संतप्त अनुयायी व समाज बांधव रस्त्यावर उतरले. यामध्ये महिलांचाही सहभाग आहे. अघोषित रास्ता रोको आंदोलनही यावेळी करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच खामगाव आणि बुलडाणा येथुन अतिरिक्त पोलिस कुमक मागविण्यात आली. घाटपुरीसह संपूर्ण खामगावात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खामगाव तालुका आणि बुलडाणा जिल्ह्यातील पोलिसांनी सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी शांतता कायम राखत पोलिसांना सहकार्य करावे, आरोपींना लवकरच शोधुन काढण्यात येईल, असे यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी संतप्त अनुयायींना सांगितले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!