अकोला : स्वामी विवेकानंद यांची जयंती, राष्ट्रीय युवकदिन म्हणून संपूर्ण देशात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात येते. स्वामींच्या १६०व्या जयंती निमित्त बाळासाहेबांची शिवसेनाच्यातर्फे विवेकानंद आश्रम गीतानगर येथे स्वामींचा पुतळा, प्रतिमेचे पूजन, हारार्पण करीत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी गोपाल नागपुरे, गजानन रोकडे, रवि देशमाने, राजेश चव्हाण, अतुल ऐडने, अविनाश खुनेरे, राज यादव, मयूर गुजर, वैभव राऊत, शिवा जगदाळे यादी कार्यकर्ते उपस्थित होते.