Home » कुवत नव्हती तर नेतृत्व का स्वीकारले : मुनगंटीवार

कुवत नव्हती तर नेतृत्व का स्वीकारले : मुनगंटीवार

by Navswaraj
0 comment

नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे पार्टीचे अध्यक्ष ठाकरे यांनी रत्नागिरीतील बारसूला भेट दिली. रिफायनरी स्थापनेला विरोध करणार्‍या ग्रामीण भागातील नागरिकांची त्यांनी भेट घेतली. यानंतर आयोजित यात्रेत त्यांनी हा प्रकल्प रत्नागिरीवर थोपविण्याचा प्रयत्न केला तर परिणाम गंभीर होतील असा ईशारा दिला. ठाकरे यांच्या या कृतीचा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी समाचार घेतला आहे.

ठाकरे यांनी राजापूर तालुक्यातील प्रस्तावित बारसू तेल रिफायनरी प्रकल्पाच्या आसपासच्या परिसराचे निरीक्षण केले. त्यांनी धोपेश्वर-गिरमादेवी कोंड येथील लोकांशी संवाद साधला. सत्ताधारी एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी ठाकरे यांच्या या कृतीचा विरोध व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांनी बारसू प्रकल्पाबाबत स्वत:च पत्र दिले होते, असे शिंदे गटाच्या नेत्यांकडून आरोप होत आहे. आपण हे पत्र केवळ आताच्या गद्दारांमुळे दिले होते, असे ठाकरे यांनी सांगितले.

ठाकरे यांच्या या वक्तव्याचा सुधीर मुनगंटीवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. कुवत नव्हती तर नेतृत्व का स्वीकारले, असा प्रतिप्रश्न मुनगंटीवार यांनी ठाकरे यांना केला आहे. मुनगंटीवार यांनी सांगितले की नाणार प्रकल्पाच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले की त्यासाठी दुसरी पर्यायी जागा देण्यात येईल. त्याचवेळी त्यांनी बारसू प्रकल्पासाठीही पत्र दिले होते. आता ते सत्तेबाहेर आहेत. त्यामुळे त्यांनी थेट घुमजाव केला आहे. जो व्यक्ती मुख्यमंत्री असताना आपल्या मर्जीने काम करू शकत नाही, अशाने महाविकास आघाडीचे नेतृत्व सोडून दिले पाहिजे, असा घणाघात मुनगंटीवार यांनी केला.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!