Home » सनातन संस्कृती महासंघाने केले सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन

सनातन संस्कृती महासंघाने केले सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन

by Navswaraj
0 comment

अकोला : अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं भारतात परत आणण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकताच ब्रिटन सरकारशी सामंजस्य करार केला. हा करार यशस्वी झाल्यामुळे सनातन संस्कृती महासंघाने सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले आहे.

छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं भारतात परत आणण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला होता. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त त्यांनी वापरलेली वाघनखं आणि जगदंबा तलवार शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात परत यावीत, यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार सातत्याने प्रयत्न करीत आहेत. केवळ सनातन संस्कृती महासंघाचे नव्हे तर संपूर्ण देशाचे छत्रपती श्री शिवाजी महाराज आराध्य दैवत आहे. त्यांनी वापरलेल्या ऐतिहासिक वस्तू भारतात परत आणण्यासाठी सुधीर मुनगंटीवार आता प्रयत्न करीत असल्याने सनातन संस्कृती महासंघाने त्यांना पत्र पाठवत या कार्यासाठी त्यांचे अभिनंदन केल्याचे सनातन संस्कृती महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख मिलिंद गायकवाड, विजय केंदरकर व देवानंद गहिले यांनी कळविले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!