Home » सावधान.. अकोल्यात विजेचा लपंडाव सुरू आहे

सावधान.. अकोल्यात विजेचा लपंडाव सुरू आहे

by Navswaraj
0 comment

अकोला : महानगरात वेळीअवेळी वीज पुरवठा खंडित होणे ही बाब आता वीज ग्राहकांच्या अंगवळणी पडली आहे. काही भाग तर महावितरण कंपनीच्या रडारवर आहेत त्यांचा कोणीही वाली नाही. बुधवार सकाळी ०९.४५ वाजता अचानक बत्तीगुल झाली. काही वेळ वाट बघून मंडल कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाला विचारणा केली असता देखभालीच्या कामासाठी परमीट घेतले असून जुने शहर, दाणा बाजार, नविन कापड बाजार व अन्य काही भागातील वीज पुरवठा  दोन तास  बंद राहिल असे सांगण्यात आले. सकाळी ०९.४५ वाजता बंद करण्यात आलेला वीज पुरवठा दुपारी ०१.३० वाजता सुरू झाला.

ब्रेकडाऊनमुळे अचानकपणे वीज पुरवठा बंद होतो, हे कोणीही समजू शकते. परंतु परमीट घेऊन देखभालीचे काम करणे हे पूर्वनियोजित असते. त्यासाठी वीज पुरवठा बंद करावा लागतो. त्यामुळे देखभालीच्या कामासाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्यास स्थानिक वृत्तपत्रांतून तसेच ज्या ग्राहकांचे मोबाईल क्रमांक पंजीकृत आहेत त्यांना वीज स्थगिती बाबत अगाऊ सूचना देणे आवश्यक आहे. महावितरण कंपनीने भविष्यात अगाऊ सूचना देण्याची व्यवस्था करावी जेणेकरून ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार नाही.

error: Content is protected !!