अकोला : जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धा व विभागीयस्तरासाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणी मध्ये अजिंक्य फिटनेस पार्क व अजिंक्य योग वर्ग येथील सोहम गावंडे, गौरव परमार, रोहन जांभे, अरहत माहुलकर, तनिष्का तिरुख, सानिध्य ढोरे, शोनक नानोटी, अनुराग पाटील, पूर्वी उजवणे, अक्षरा माहुलकर, जिया मेहता, जाना मेहता व वैष्णवी शाहु यांनी विविध गटातून सहभाग नोंदवला.
यामधुन अरहत माहुलकर, तनिष्का तीरुख, रोहन जांभे, गौरव परमार, सोहम गावंडे यांची विभागीय स्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धेकरता निवड झाली आहे. प्रशिक्षक प्रशांत वाहुरवाघ व माया भुईभार तसेच योग विद्या धाम पदाधिकारी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
ही सर्व मुले अजिंक्य फिटनेस पार्क तर्फे आयोजित सूर्यनमस्कार साखळी/रिले मध्ये सहभाग घेणार आहेत. ही रिले 28 जानेवारी 2023 ते 29 जानेवारी 2023 अशा प्रकारे 26 तास होणार आहे. यामध्ये इतर विद्यार्थी नागरिकही आपला सहभाग नोंदवू शकतात. प्रशिक्षण, सराव, नोंदणीसाठी अजिंक्य फिटनेस पार्क, केडिया प्लॉट, आयुर्वेदिक कॉलेज कॅम्पस, अकोला.0724-2453155, 9422193523 येथे संपर्क साधावा असे आवाहन कारण्यात आले आहे.