Home » विद्यार्थ्यांना उत्सवासाठी शिक्षा करता येणार नाही

विद्यार्थ्यांना उत्सवासाठी शिक्षा करता येणार नाही

by Navswaraj
0 comment

अकोला : रक्षाबंधन किंवा त्यासारख्या उत्सवामध्ये हाताला राखी बांधली किंवा डोक्यावर तिलक लावला म्हणून विद्यार्थ्यांना यापुढे शाळेत शिक्षा करता येणार नाही. भारत सरकारच्या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने हे निर्देश देशभरातील शाळांना दिले आहे. शाळांनी अशी कोणतीही शिक्षा केल्यास यापुढे ती बालकांची शारीरिक व मानसिक प्रताडना म्हणून ग्राह्य धरण्यात येईल, असेही आयोगाने ३० ऑगस्ट २०२३ रोजी जारी केलेल्या दिशानिर्देश पत्रात नमूद केले आहे.

अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हातावर राखी किंवा धार्मिक धागा बांधल्यामुळे किंवा कपाळावर तिलक लावल्यामुळे रागविण्यात येते. मुलींना उत्सवाच्या काळात हातावर मेहंदी काढण्यापासून रोखण्यात येते. उत्सवाच्या काळात विद्यार्थ्यांनी असे कृत्य केल्यास त्यांना शाळेत शिक्षा करणे यापुढे दखलपात्र समजण्यात येणार आहे. यासंदर्भात राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानुनगो यांनी विशेष दिशानिर्देश जारी केले आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!