Home » नाराज बच्चू कडू यांच्या मतदार संघाला शिंदे सरकारकडून 500 कोटींचे गिफ्ट

नाराज बच्चू कडू यांच्या मतदार संघाला शिंदे सरकारकडून 500 कोटींचे गिफ्ट

by Navswaraj
0 comment

मुंबई : मंत्रिपद न मिळाल्यामुळे प्रहार संघटनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू नाराज आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता शिंदे सरकारने खास भेट दिली आहे. बच्चु कडू यांच्या अचलपूर मतदार संघातील सपन प्रकल्पाला 500 कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

अलीकडेच आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये वाद पेटला व त्यावर पडदाही पडला. पण अजूनही बच्चू कडू नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नाराज असलेल्या आमदार बच्चू कडू यांना खुश करण्याचा शिंदे सरकारने प्रयत्न केला आहे. सपन मध्यम प्रकल्पाला 500 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आला आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!