Home » बारावीच्या निकालात कोकण विभागाची बाजी

बारावीच्या निकालात कोकण विभागाची बाजी

by Navswaraj
0 comment

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा देखील कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक ९७.२१ टक्के आहे. सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा ९०.९१ टक्के लागला आहे. यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे,  अशी माहिती महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत कोरोना नंतर ऑफलाईन पद्धतीने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा मार्च-एप्रिल २०२२ अंतर्गत लेखी परीक्षा दिनांक ०४ मार्च २०२२ ते ०७ एप्रिल २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यंदा  १३,५६,६०४ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा निकाल हा ९८.३०. टक्के तर कला शाखेचा निकाल ९०.५१ टक्के,वाणिज्य शाखेचा निकाल हा ९१.७१ टक्के लागला आहे. व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचा निकाल हा ९२.४० टक्के आणि आय. टी.आय विभागाचा निकाल हा ६६.४२ टक्के लागला आहे.

error: Content is protected !!