अकोला : महानगरातील जवळपास सर्व प्रमुख रस्ते व त्यांना जोडणारे रस्ते काॅन्क्रिटचे बनवले आहेत. काहींचे काम सुरू आहे. योग्य नियोजन तसेच दूरदृष्टीचा अभाव यामुळे रस्त्यांची ऊंची जास्त वाढली आहे. रस्त्यालगतची घरे, दुकाने खोलात गेल्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी घरे व दुकानात शिरते. बऱ्याच रस्त्यांचा शेवट मिळवण्यात आलेला नाही. रस्त्यांच्या गुणवत्तेबद्दल न बोललेलेच बरे.
मोठ्या प्रमाणात वहातूक असलेला जठारपेठकडून टावर चौकात जाणाऱ्या रस्त्याची रुंदी स्टेट बॅंकेचे भिंती पासून थेट टावर चौका पर्यंत सर्व्हिस लाईन ईतकी आहे. त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होते. रस्त्याच्या कडेवरून दुचाकी वाहने घसरून दररोज किरकोळ अपघात घडतात.
जागेबद्दल बॅंकने आक्षेप घेतल्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण होऊ शकले नाही. परिणामी नागरीकांना त्रास सोसावा लागत आहे. शासकीय जागेचा वापर जनहितार्थ होणार असल्यामुळे अडचण निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. शासनाच्या विभागांचा आपसातील वाद, संघर्ष, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न तसेच वर्चस्वाचा मुद्दा यागोष्टी नित्याच्या झाल्यामुळे यात नाविन्य असे काही नाही. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्यामुळे जनप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी यात विशेष लक्ष घालून हा तिढा सोडवावा.