Home » नागपूर, खामगाव अकोला मार्गे पंढरपूरसाठी रेल्वे

नागपूर, खामगाव अकोला मार्गे पंढरपूरसाठी रेल्वे

by Navswaraj
0 comment

अकोला : आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वे नागपूर-पंढरपूर, नवीन अमरावती-पंढरपूर या अकोला मार्गे १६ विशेष रेल्वे फेऱ्या सोडणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबईस्थित मुख्यालयातून ही माहिती देण्यात आली. मध्य रेल्वे नागपूर-मिरज, नागपूर-पंढरपूर, नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर, लातूर-पंढरपूर, मिरज-पंढरपूर, मिरज-कुर्डूवाडी अशा एकूण ७६ फेऱ्या चालविणार आहे.

गाडी क्रमांक 01205 विशेष गाडी 25.06.2023 आणि 28.06.2023 (2 सेवा) रोजी 08.50 वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11.55 वाजता मिरजला पोहोचेल. गाडी क्रमांक 01206 विशेष मिरज येथून 26.06.2023 आणि 29.06.2023 (2 सेवा) रोजी 12.55 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.25 वाजता नागपूरला पोहोचेल. गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसाबा डोंगरगाव, जठरगाव धालगाव, कवठेमहांकाळ व सुलगरे येथे थांबे असतील. दोन तृतीय वातानुकूलित, 9 शयनयान, 9 सामान्य द्वितीय श्रेणी यासह 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन अशी या गाडीची संरचना असेल.

गाडी क्रमांक 01207 स्पेशल नागपूरहून 26.06.2023 आणि 29.06.2023 (2 सेवा) रोजी 08.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 08.00 वाजता पंढरपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक 01208 विशेष पंढरपूर येथून 27.06.2023 आणि 30.06.2023 (2 सेवा) रोजी 17.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.25 वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी येथे थांबा असेल. एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान, 7 सामान्य द्वितीय श्रेणी यासह 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन अशी या गाडीची संरचना असेल.

नवीन अमरावती-पंढरपूर विशेष : गाडी क्रमांक 01119 विशेष नवीन अमरावती येथून 25.06.2023 आणि 28.06.2023 (2 सेवा) रोजी 14.40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 09.10 वाजता पंढरपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक 01120 विशेष पंढरपूर येथून 26.06.2023 आणि 29.06.2023 (2 सेवा) रोजी 19.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 12.40 वाजता नवीन अमरावती येथे पोहोचेल. या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी येथे थांबा असेल. एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान, 7 सामान्य द्वितीय श्रेणी यासह 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन अशी गाडीची संरचना आहे.

खामगाव-पंढरपूर विशेष (4 सेवा) : गाडी क्रमांक 01121 विशेष खामगाव 26.06.2023 आणि 29.06.2023 (2 सेवा) रोजी 11.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 03.30 वाजता पंढरपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक 01122 विशेष पंढरपूर येथून 27.06.2023 आणि 30.06.2023 (2 सेवा) रोजी 05.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 19.30 वाजता खामगावला पोहोचेल. या गाडीला जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी येथे थांबा असेल. एक द्वितीय वातानुकूलित, एक तृतीय वातानुकूलित, 6 शयनयान, 12 सामान्य द्वितीय श्रेणी यासह 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन अशी गाडीची संरचना आहे. गाडीसाठी ऑनलाईन आरक्षणही सुरू करण्यात आले आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!