Home » अकोल्यात मतदार यादी अद्ययावत करण्यास सुरुवात

अकोल्यात मतदार यादी अद्ययावत करण्यास सुरुवात

by Navswaraj
0 comment

अकोला : अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघातील मतदार यादी अद्यावत करण्यास सुरुवात झाली आहे . जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली . बुधवार ९ नोव्हेंबर २०२२ पासून ५ जानेवारी २०२३ पर्यंत ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे .

९ नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली . या मतदार यादी वर ८ डिसेंबर २०२२ पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहे . नवीन मतदारांची नावे नोंदविण्यासाठी १९ , २० नोव्हेंबर आणि ३, ४ डिसेंबर २०२२ रोजी विशेष शिबीर घेण्यात येणार आहे . जिल्ह्यातील सर्व ग्रापंचायती मध्ये १० नोव्हेंबर २०२२ रोजी मतदार यादीचे ग्राम सभेत वाचन करण्यात येईल.

विद्यार्थी , दिव्यांग व्यक्ती आणि महिलांसाठी १२ , १३ नोव्हेंबर २०२२ रोजी विशेष शिबीर घेण्यात येईल. तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला , घर नसलेल्या भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्तींसाठी २६ व २७ नोव्हेंबर रोजी विशेष शिबीर घेण्यात येईल. मतदार यादी वरील सर्व दावे व हरकती २६ डिसेंबर २०२२ रोजी निकाली काढण्यात येतील. त्यानंतर अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. अमरावती विभाग पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमाची माहितीही या वेळी देण्यात आली. ३० डिसेंबर २०२२ रोजी या मतदार संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!