अकोला : बाॅक्सिंग मध्ये अकोल्याचे नावलौकिक वाढले आहे. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अकोला येथील बाॅक्सरनी उत्तम कामगिरी केली आहे. आर्मेनिया येथे होणाऱ्या विश्व बाॅक्सिंग स्पर्धेकरता भारतीय संघाची निवड करण्यासाठीची चाचणी हरयाणा राज्यातील रोहतक येथे ७ ते १० नोव्हेंबर दरम्यान होत आहे. या निवडचाचणी साठी अकोला येथील सहा बाॅक्सरची निवड झाली असून यात पाच महिला व एक पुरूष आहे.
अकोला क्रीडा प्रबोधीनीचे ४८ किलो वजन गटात रवींद्र पाडवी, समीक्षा सोळंकी, पलक झामरे, रेवती उंबरकर, पूर्वा गावंडे व भक्ती यांचा समावेश आहे. दिया बचे, गजानन कबीर हे प्रशिक्षक तर अक्षय टेंभूर्णीकर पंच म्हणून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाॅक्सिंग प्रशिक्षक तसेच अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी सतिषचंद्र भट सर्व बाॅक्सरना प्रशिक्षण देत आहेत.