Home » अमरावतीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मौन श्रद्धांजली 

अमरावतीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मौन श्रद्धांजली 

by Navswaraj
0 comment

अमरावती : ग्रामगीता आणि आपल्या अविस्मरणीय कार्यातून जगविख्यात झालेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत लाखों गुरुदेव भक्तांनी मौन श्रद्धांजली अर्पण केली.

अमरावती जिल्ह्यातील गुरूकुंज मोझरी येथे गुरुवारी (ता. २) मौन श्रद्धांजलीचा हा कार्यक्रम संपन्न झाला. गुरुवारी दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी मौन श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही दरवर्षीप्रमाणे थांबली होती. अमरावतीच्या लोकसभा खासदार नवनीत राणा, राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे, तिवसा मतदार संघाच्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, अकोल्याचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी, आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह सर्वच पक्षातील वरिष्ठ नेते, गुरूदेव भक्त यावेळी प्रामुख्यानं उपस्थित होते. श्रद्धांजली कार्यक्रमादरम्यान सर्वधर्मीय प्रार्थनाही म्हणण्यात आल्या. देशभरातील सुमारे तीन लाख गुरूदेव भक्त या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जगभरातील २० पेक्षा अधिक परदेशातील गुरूदेव भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थिती नोंदविली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!