Home » आठवडी बाजाराच्या दिवशी बेशिस्त दुकाने; शेगाव शहर व्यापाऱ्यांनी दिली तक्रार

आठवडी बाजाराच्या दिवशी बेशिस्त दुकाने; शेगाव शहर व्यापाऱ्यांनी दिली तक्रार

by Navswaraj
0 comment

शेगाव : स्थानिक किराणा व्यापारी व फेरीवाला यांच्यात झालेल्या सुनियोजित बाचाबाची चे रूपांतर मोठ्या घटनेत झाले. त्याला धार्मिक रंग देण्याचाही प्रयन्त झाला. परंतु व्यापाऱ्यांच्या सामंजस्यामुळे अनर्थ टळला. असे वाद दर आठवडी बाजाराच्या दिवशी होत असतात. याला कारण स्थानिक प्रशासनाची उदासीनता. वारंवार निवेदन, तक्रार देऊनही प्रशासन कुठलीच पावले उचलत नाही. त्यामुळे स्थानिक व्यापारी, नागरिकांचे आर्थिक  नुकसान होत असून मानसिक त्रास होतो आहे.

याच्या निषेधार्त ७ डिसेंबरला स्थानिक तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, नगरविकास मंत्री, पोलीस अधीक्षक, नगर परिषद मुख्याधिकारी यांना आठवडी बाजारसाठी स्थायी जागा मिळण्याबाबत, शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी, शहरातील वेश्या व्यवसाय, अवैध धंदे याला लगाम घालण्यासाठी निवेदन देण्यात आले. शेगाव शहर व्यापारी परिषद, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, सीपीडीए असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, किराणा असोसिएशन, शेगाव संघर्ष समिती यांच्यावतीने तक्रार देण्यात आली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!