Home » व्यापाऱ्यांनी लावलेला बॅनर नागपूरमध्ये ठरतोय चर्चेचा विषय

व्यापाऱ्यांनी लावलेला बॅनर नागपूरमध्ये ठरतोय चर्चेचा विषय

by नवस्वराज
0 comment

नागपूर : महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने इच्छुकांची गर्दीही तेथे वाढू लागली आहे. अशात नागपुरातील महाल भाग म्हणजे भाजपचा गढ. भाजपचे अनेक नेते महाल भागात राहतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालायही येथे आहे. त्यामुळे महाल परिसरातील बडकस चौक भाजप नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी होणारे ठिकाण, पण येथे लागलेला एक फलक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

महालमधील बडकस चौक हा भाजप नेत्यांचे सकाळी भेटण्याचे प्रमुख स्थान, सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने इच्छुकांची गर्दीही तेथे वाढू लागली. त्याचा त्रास तेथील व्यापाऱ्यांना होऊ लागला. त्यामुळे त्यांनी ‘इच्छुकांनी गर्दी करु नये’ असा फलकच लावला आहे.

बडकस चौकात भाजप प्रदेश प्रवक्ताचे कार्यालय आहे. शिवाय माजी महापौर व शहर अध्यक्षांचे निवासस्थानही चौकापासून काही अंतरावर आहे. भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना भेटायचे असेल तर त्याला बडकस चौकात बोलवले जाते. रोज सकाळी येथे कार्यकर्ते, नेत्यांची वर्दळ असते. गप्पा रंगतात. महापालिका निवडणूक जवळ आल्याने ही गर्दी वाढतच आहे. या गर्दीचा त्रास येथील व्यापाऱ्यांना होत असल्याने त्यांनी फलक लावत आपला राग व्यक्त केला आहे.  सध्या हा फलक नागपुरात व नागपुरातील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

error: Content is protected !!