Home » अमरावतीमध्ये जीर्ण दुकान कोसळले, ढिगाऱ्याखाली तीन जण दबले

अमरावतीमध्ये जीर्ण दुकान कोसळले, ढिगाऱ्याखाली तीन जण दबले

by नवस्वराज
0 comment

अमरावती : शहरातील प्रभाग चौकात दोन मजली दुकान कोसळल्याने खळबळ उडाली. इमारतीच्या मलब्याखाली तीन जण दबल्याची माहिती आहे. स्थानिक लोक आणि अग्निशमन दलाने बचावकार्य हाती घेतले.

प्रभाग चौकात राजदीप बॅगचे हे दुकान असल्याचे सांगण्यात येत आहे. ही इमारत जीर्ण झाली होती. या जीर्ण बांधकामाबाबत महापालिकेने नोटीस ही बजावली होती. ईमारतीचा वरचा माळा रिकामा करण्यात आला होता. मात्र तळ मजल्यावर दुकाने सुरू होती. या ईमारतीत कोणतीही पूर्वपरवानगी न घेता दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक ही ईमारत कोसळली.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!