Home » Mumbai Shiv Sena : शिवसेना खासदाराची वादग्रस्त पोस्ट 

Mumbai Shiv Sena : शिवसेना खासदाराची वादग्रस्त पोस्ट 

by नवस्वराज
0 comment

Mumbai | मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा सदस्य संजय राऊत एका वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांच्या वादग्रस्त पोस्टमुळे इस्रायल नाराज झाला आहे. हमास आणि इस्त्रायल यांच्यामधे गाझापट्टीत मागील सव्वा महिन्यापासून भीषण युद्ध सुरु आहे. गाझापट्टीतील अल-शिफा इस्पितळाच्या परिस्थिती बाबतच्या अहवालाची माहिती ट्विटर (एक्स) या सामाजिक माध्यमावर सामायिक करताना खासदार संजय राऊत यांनी हिंदीतून लिहिले आहे की, ‘आता त्यांना लक्षात आले की हिटलर ज्युंचा द्वेष का करायचा.’ या पोस्टमुळे इस्त्रायल मध्ये नाराजी पसरली आहे. (Shivsena Uddhav Thackeray Group’s Rajyaya Sabha Member Sanjay Raut Quotes In His Hindi Post From Mumbai Why Hitler Hated Jews)

इस्त्रायल दूतावासाने भारताच्या परराष्ट्र मंत्रालय आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र लिहून सामाजिक माध्यमावर ज्युंच्या नरसंहाराला योग्य ठरवणाऱ्या संजय राऊत यांनी केलेल्या लिखाणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या लिखाणावर राऊत यांनी आता सारवासारव केली आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!