Home » ‘ठाणे’दार लागला गळाला, बीएमसी निवडणुकीत शिवसेना जाणार तळाला?

‘ठाणे’दार लागला गळाला, बीएमसी निवडणुकीत शिवसेना जाणार तळाला?

by Navswaraj
0 comment

नागपूर : ठाण्यातील दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे शिष्य असलेले आणि शिवसेनेतील ‘ठाणे’दार भाजपचा हाती लागल्याचा मोठा फटका शिवसेनेला बसणार आहे. शिवसेनेला राज्यातील सत्तेसोबतच बृहन्मुंबई महापालिका गमवावी लागू शकते.

शिवसेनेचा सर्वाधिक जोर मुंबईतच आहे. त्यातही मुंबई महापालिकेतील सत्ता शिवसेनेसाठी प्रतिषठेचा प्रश्न आहे. अशांत शिंदे भाजपसोबत गेल्यास शिवसेनेला ठाण्यात मोठा फटका बसेल यात शंकाच नाही.

शिवसेना स्थापन झाल्यापासून आजपर्यंतचे हे सर्वात मोठे बंड आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेनेने शिंदे यांचे गटनेते पद काढून घेतले आहे. त्यामुळे शिवसेना शिंदेवर कारवाई करणार आणि शिंदे भाजप सोबत जाणार हे निश्चित दिसत आहे.

error: Content is protected !!