Home » लोकसभेच्या प्रतोद पदी राजन विचारे , खासदार भावना गवळी यांना हटविले

लोकसभेच्या प्रतोद पदी राजन विचारे , खासदार भावना गवळी यांना हटविले

by नवस्वराज
0 comment

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडानंतर शिवसेना सावध झाली आहे. अशात राजन विचारे यांची लोकसभेतील शिवसेनेचे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भावना गवळी यांना लोकसभा प्रतोदपदावरून हटविण्यात आले आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्र लिहून माहिती दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर भावना गवळी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. पत्रात एकनाथ शिंदे यांची भूमिका योग्य असल्याचे भावना गवळी यांनी म्हटले होते. यामुळे भावना गवळीही पक्ष सोडणार असल्याची चर्चा रंगली होती. यामुळेच की काय शिवसेनेने भावना गवळी यांची उचलबांगडी करीत लोकसभेतील प्रतोद पदावरून हटविले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!