Home » बंडखोरांना सुबुद्धी मिळावी म्हणून अकोल्यात महाआरती

बंडखोरांना सुबुद्धी मिळावी म्हणून अकोल्यात महाआरती

by Navswaraj
0 comment

अकोला : शिवसेनेतील बंडखोर आमदारांना सुबुद्धी मिळावी आणि सरकारवरील विघ्न टळावे, यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा राम मंदिर येथे महाआरती केली.

रविवार (ता. 26 जून) सकाळी शिवसेना नेते तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या मार्गदर्शनात या महाआरतीचे आयोजन करण्यात आले. माजी महापौर श्रीरंग पिंजरकर, तरुण  बगेरे आदी यावेळी उपस्थित होते. महाआरतीनंतर शिवसेनेच्या नेत्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

महाआरतीला उपस्थित शिवसेना कार्यकर्ते. (छाया : दीपक शर्मा)

यावेळी बोलताना बाजोरिया म्हणाले, “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले. बाळासाहेबांनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हिताचे शिवधन्युष्य पेलले. परंतु संधीसाधू लोकांनी बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासोबत दगा केला. अकोल्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत प्रामाणिक आहे”, असे ते म्हणाले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!