Home » उद्धव ठाकरे-बाळासाहेब आंबेडकर यांचे शिवशक्ती भीमशक्ती एकत्रीकरण

उद्धव ठाकरे-बाळासाहेब आंबेडकर यांचे शिवशक्ती भीमशक्ती एकत्रीकरण

by Navswaraj
0 comment

मुंबई : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली. या युतीमुळे मोदी युगाचाही अस्त होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, देशहिताच्या नावाखाली सध्या अनेक भ्रम पसरवले जात आहे. देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत. प्रकाश आंबेडकर यांनीही एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचाही अंत होईल, असे म्हटले.

ठाकरे म्हणाले, आज एका स्वप्नाची पूर्ती झाली आहे. महाराष्ट्रातील जनता या युतीची आतुरतेने वाट पाहत होते. प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा आणि माझे वडील या दोघांनीही समाजातील वाईट चालीरितींवर घणाघाती प्रहार केले. आतादेखील राजकारणात काही वाईट चालीरीती शिरल्या आहेत. त्यांचा नायनाट करण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसदार एकत्र आले आहेत.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!