अकोला : पीक विम्याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यानं गुरुवारी (ता. ९) अकोला येथे कार्यकर्त्यांनी एसडीएफसी अॅग्रो या पीक विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी अकोला येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी रक्कम न मिळाल्यास विमा कार्यालयं फोडू असा इशारा आंदोलकांनी दिला होता. त्यानुसार आज त्यांच्या संतापाचा भडका उडाला. आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतरही विमा कंपन्या व प्रशासन कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी कौलखेड भागात असलेले पिक विमा कंपनीचं कार्यालय गाठत तेथे जबरदस्त तोडफोड केली. २५ टक्के पीक विम्याची अधिसूचना काढूनही शेतकऱ्यांना रक्कम मिळालेली नाही. अतिवृष्टीमुळं कापूस, सोयाबीन, तुरीच्या पिकांचं अतोनात नुकसान झालय. त्यामुळं शेतकऱ्यांना रक्कम का देण्यात येत नाहीये, असा प्रश्न शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं उपस्थित केला आहे.