Home » अकोल्यात शिवमहापुराण कथेला उत्साहात प्रारंभ

अकोल्यात शिवमहापुराण कथेला उत्साहात प्रारंभ

by Navswaraj
0 comment

अकोला : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिवकथाकार पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या उपस्थितीत अकोल्यात शिवमहापुराण कथेला सुरुवात करण्यात आली. म्हैसपूर येथील सभामंडपात या कथेला सुरुवात झाली. श्री स्वामी समर्थ शिवमहापुराण कथा महोत्सव असे या आयोजनाचे नाव आहे.

शुक्रवार, ५ मे २०२३ रोजी सकाळी वाशीम मार्गावरील म्हैसपूर येथे उभारण्यात आलेल्या विशाल सभामंडपात कथेला प्रारंभ झाला. ११ मे पर्यंत दररोज सकाळी ८ ते ११ या वेळेत ही कथा होणार आहे. या कथा महोत्सवातून शिवमहापुराण शिवभक्ती अनुभवण्यासाठी देशाच्या कोनाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक अकोल्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे म्हैसपुरात शिवभक्तीचा महापूर आला आहे.

कथा महोत्सवासाठी सुरक्षा व व्यवस्थेसाठी प्रशासनही सरसावले आहे. प्रशासनाच्यावतीने डॉक्टरांसह आरोग्य पथक, चार रुग्णवाहिका, अग्निशमन बंब आदी उपाययोजना करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन दलाची दोन पथके कथास्थळी तैनात आहेत. आयोजक आणि प्रशासन यांच्यात समन्वय राखण्यासाठी मध्यवर्ती कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. कथास्थळी बुधवार, ३ मे २०२३ पासूनच भाविक दाखल झाले होते. गुरुवार, ४ मे २०२३ रोजी सायंकाळपर्यंत देशभरातून हजारो भाविक कथास्थळी दाखल झाले. शुक्रवारी कथा सुरू होण्यापूर्वी दोन्ही सभामंडप भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. आगामी दिवसात भाविकांची संख्या लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!