Home » शरद पवारांनी उडवली बच्चू कडूंची खिल्ली

शरद पवारांनी उडवली बच्चू कडूंची खिल्ली

by Navswaraj
0 comment

कोल्हापूर : काका-पुतण्या मिळून महाराष्ट्राला येड्यात काढत आहे, अशी टीका प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी केली होती. त्यावरून शरद पवारांनी आमदार बच्चू कडूंची चांगलीच खिल्ली उडवली. कोल्हापुरात आयोजित एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

बच्चू कडूंच्या आरोपांविषयी पत्रकारांनी विचारल्यावर पवार म्हणाले, ‘कोण ए बाबा?’. ‘मी एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष आहे. चार वेळेला एका राज्याचा मुख्यमंत्री राहिलेलो आहे. केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मी सांभाळली आहे. मला कोणाच्याही वक्तव्यांबाबत काय विचारता. उद्या गल्लीबोळातील लोकांविषयी मला प्रतिक्रिया विचाराल’, असे नमूद करीत त्यांनी आमदार कडु यांची खिल्ली उडवली. बच्चू कडू कोणाच्याही पाठिंब्याशिवाय चार वेळेस निवडून आलेले आहेत. ते चार वेळेस आमदार राहिलेले आहेत. त्यावर शरद पवार लगेच उत्तरले, बच्चू कडू चार वेळेस आमदार झालेत, तर मी चार वेळेस मुख्यमंत्री राहिलेलो आहे. काही फरक आहे ना? शरद पवारांच्या या वक्तव्यावर समोरील पत्रकारांनाही हसू आवरले नाही.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!