Home » अनुवादकाने दोन्ही भाषेचे सौंदर्य जपत अनुवाद करावा!

अनुवादकाने दोन्ही भाषेचे सौंदर्य जपत अनुवाद करावा!

‘भारतीय व जागतिक साहित्य विश्वात मराठीची ध्वजा फडकवणारे अनुवादक’ या विषयावर परिसंवादातील सूर

by Navswaraj
0 comment

वर्धा : अनुवाद म्हणजे दोन भाषा, संस्कृती, प्रांत यांना जोडणारा पुल आहे. अनुवाद करताना अनुवादकाने दोन्ही भाषा आंतरिक मनाने समजून घेत भाषेचे सौंदर्य जपत अनुवाद करावे, असे मत ९६व्या अखिल भारतीय साहित्य संमलेनात ‘भारतीय व जागतिक साहित्य विश्वात मराठीची ध्वजा फडकवणारे अनुवादक’ या विषयावर आयोजित परिसंवादात उपस्थित व्यक्त्यांनी मांडले. यापरिसंवादात डॉ.बळीराम गायकवाड, अरूणा जोशी उपस्थित होते. परिसंवदाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विनया बापट होत्या.

भारतासारख्या देशात विविध जात, धर्म, भाषा असल्यातरी आज देश एकसंघ आहे. याला कारण, म्हणजे अनुवाद. अनुवादाची पार्श्वभूमी जुनी आहे. १७व्या शतकात अनुवादाची सुरुवात झाली. मराठी साहित्य असे एकमेव आहे की ज्याचा अनुवाद जगातील सर्व भाषेमध्ये झाला आहे. कोसला, बलुत, अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा तर झेक, रशियन,फ्रेंच, जर्मन या भाषेत अनुवाद झालेला आहे. मराठीच्या साहित्याला फार जुनी परंपरा  संत ज्ञानेश्वर ते संत चोखामेळा पासून आहे. आज भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन आशावादी झालेला आहे. एक उभरते नेतृत्व म्हणून भारताकडे जग बघत आहे. भारतातील साहित्य हे जगापलीकडे नेण्याचे किमया ही अनुवादाने केली आहे. यामध्ये मराठी साहित्याचा वाटा सर्वांत जास्त आहे.

अनुवादकाने लेखकाचा वैचारिक हेतू जाणून घेऊन अनुवाद करावा.
जगातील पहिले अनुवादित पुस्तक १८४१ मध्ये जॉन बेनन याचे मराठीमध्ये यांत्रिकीकरण हे हरी केशव यांनी मराठीमध्ये केले. यमुना पर्यटन ही कादंबरी बाबा पदमजींनी अनुवादित केली आहे. गीतांजली यांनी केलेल्या अनुवादित पुस्तकाला बुकर्स चा पुरस्कार प्राप्त झाला. शांता गोखले यांनी अनुवादित केलेल्या लक्ष्मीबाई टिळक यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाला साहित्य अकादमी दिल्लीचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला असल्याची माहिती डॉ. बळीराम गायकवाड यांनी दिली.
अरुणा जोशी  आपले विचार मांडताना  म्हणाला, भारतीय साहित्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन समजून घेऊन त्यानुसार अनुवादकाने लेखन करणे गरजेचे आहे. मौलीक विचार ज्या साहित्यात आहेत त्याला जगात मान्यता मिळत आहे. जगात मराठी साहित्यची मागणी असलेले संत साहित्य, दलित साहित्य, आधुनिक नाटके, कविता, स्त्री साहित्य हे जास्त करून अभ्यासले जातात. यावरून या क्षेत्रात वैचारिक लेखन करणे अपेक्षित आहे. मराठी साहित्य हे जगात सर्व दूर अभ्यासले जाणारे  अजरामर आहे, त्यामुळे मराठी साहित्याला महत्व प्राप्त झाले आहे. संपर्क, दळणवळणासाठी दोन्ही भाषा समजून घेणं गरजेचं आहे, यासाठी अनुवाद समजून घेणे गरजेचे आहे, असेही अरुणा जोशी यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अनुवादित केलेले पुस्तक व अनुवाद यांची यादी वाचून दाखवली.

परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. विनया बापट यांनी आपले विचार मांडताना, अनुवाद करताना कोणत्या गोष्टी कडे विशेष लक्ष द्यावे, याची माहिती दिली. भारत स्वतंत्र झाल्यापासून लेखकावरील वसवाहतिक मानसिकतेतून आता अनुवाद बाहेर येत आहे. ऐतिहासिक, व्यावहारिक घटनेमुळे इंग्रजीचे वर्चस्व जगभर होऊ लागले आहे. भारतात कुठलेही पुस्तक इंग्रजीमध्ये प्रकाशित झाले की त्याचा भारतात सर्व भाषेमध्ये अनुवाद झालेला असतो, असेही विनया बापट यांनी सांगितले आहे.
अनुवाद करताना येणाऱ्या अडचणी व त्या अडचणींचा सामना कसा करायचा याचेही विवेचन त्यांनी बोलताना केले. परिसंवादाचे सूत्रसंचालन शलाका जोशी यांनी केले. अर्चना धानोरकर यांनी आभारप्रदर्शन केले.

तुम्हाला देखील आवडेल

error: Content is protected !!